धुणे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या पाच चिमुकल्या मुलींचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तळेगाव वाडी तालुका भोकरदन येथे आज दुपारी घडली. मृत्यूमुखी पडलेल्या मुली पाच ते सात वयोगटातील असून यात दोन सख्ख्या बहिणींचा समावेश आहे. आशुबी लतीफ पठाण वय ६, नवाबाबी नवाज पठाण वय ६, अल्फीदाबी गौसखाँ पठाण वय ७, सानियाबी अस्लम पठाण वय ६, शबुबी अस्लम पठाण वय ५ राहणार सर्व तळेगाव वाडी अशी मृत मुलींची नावे आहेत.
दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान ही घटना उघड घडली. यात नाजिमा आसिफ पठाण ही मुलगी बचावली आणि तिने आरडाओरड करीत गावात ही घटना सांगितली. त्यानंतर गावकऱ्यांनी तातडीने धाव घेत शोध सुरू केला. हसनाबाद पोलीस स्टेशन ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोडके तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी सर्व मुलींचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले होते.